Wednesday, August 17, 2022

कोरोनाच्या धोकादायक ओमायक्रॉन पासून भारताची होणार सुटका ! ही लस करणार काम…

सध्या साऱ्या जगामध्ये कोरोना व्हायरस च्या नव्या व्हेरीयंट ने धुमाकूळ घातलेला आहे. आफ्रिका देशातून याची सुरुवात झाली नी बघता बघता या नव्या कोरोनाने जगाला वेढा घातला आहे. भारतात सुद्धा सर्व राज्यात ठिकठिकाणी याचे संक्रमण बाधित रुग्ण सापडत आहेत.

त्यामुळे सगळेच अस्वस्थता मध्ये आहेत. तसे पाहिलं तर सारं जग गेली दोन वर्षे झालं चीनच्या वुहान मधून पसरलेल्या कोरोना व्हायरस मुळे चिंतेत आहे. संकटातून वाट काढत जगत आहे. पण काही संकटं थांबायची नाव घेत नाही आहेत.

कोरोनाच्या या नव्या व्हेरीयंटचं नाव आहे, ओमायक्रॉन. होय ! सध्या या व्हायरस ची एकच दहशत निर्माण झाली आहे. बरं त्यात हा व्हायरस एवढा घातक आहे असं म्हंटलं जात आहे की लसीकरण झालेल्या ना सुद्धा होत आहे. मग कोवक्सिन घेतलेली असो नाहीतर कोविशीलड. प्रमाण मात्र लस घेतलेले जे आहेत त्यांचं कमी आहे. त्यांना ओमायक्रॉन हा व्हायरस काही लईच जीवघेणा नाही आहे.

पण तरी ही यावर आता काही तोडगा निघतोय का ? जग यातून बाहेर येतय का ? याच्याच सर्व अभ्यासात मग्न आहेत. त्यात एक आनंदाची म्हणावी अशी बातमी आलेली आहे. कारण एका सर्वेक्षण मध्ये भारताची कोव्हीशिल्ड ही लस थोडी या विषाणू विरोधात ठामपणे लढा देत आहे.

युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी ने शुक्रवारी सांगितले की भारताची कोव्हीशिल्ड या लसीचा तिसरा डोस हा 70 ते 80 टक्के नव्या डेंजर विषाणू शी लढा देऊ शकतो. त्यामुळे आता सगळीकडे काही प्रमाणात का होईना दिलासा देणारं वातावरण तयार झालेलं आहे. या लसीचे दोन्ही डोस हे डेल्टा पासून संरक्षण देत होते; पण ओमायक्रॉन पासून मात्र अवघड आहे. त्यामुळे तिसरा डोस घेणं आवश्यक आहे असं या एजन्सी चं म्हणणं आहे. जे अभ्यासातून समोर आलेलं आहे.

या एजन्सी च्या डॉ मेरी म्हणाल्या की या नव्या विषाणू ने ब्रिटनमध्ये खूप दहशत निर्माण केली आहे. कारण सद्यस्थिती जर कायम राहिली तर येत्या अवघ्या काही दिवसातच रुग्णसंख्या ही 10 लाखाच्या वर जाईल. त्यामुळे आधीच्या व्हायरस च्या बदलाच्या फटक्याच्या अनुभवाचा विचार केला तर वर्क फ्रॉम होम व घरीच लॉक डाउन स्थितीत राहून लसीकरण तिसरा बूस्टर डोस घ्यावाच लागेल. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.

वाचक मित्रानो, बातमीचा आधार घेऊन आपण थोडी जास्त स्वतःची व जगाची काळजी घेऊया व या व्हायरस सोबत घरी राहून गर्दीत न जाऊन एकीने लढूया. काळजी घ्या सुरक्षित रहा.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -