अपघात म्हणजे अनपेक्षितपणे पदरी पडलेली घटना. त्यामुळे प्रवास करताना जरा जपून काळजीपूर्वक करा. कारण कधी कुणासोबत काय होईल याचा काहीच भरवसा देता येत नाही. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार तामिळनाडू राज्यातील कुंनुर येथे रक्षा विभाग म्हणजे सीडीएस जनरल बिपिन रावत व त्यांची पत्नी यांसमवेत 13 जणांची हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये निधन झालं आहे.
ही खूप दुर्दैवी घटना आहे. देशाच्या रक्षा मंत्रालयाने यावर शोक व्यक्त केला आहे. तसेच उद्या संसदेत या घटनेची सर्व तपशील सहित माहिती देण्यात येणार असल्याचं कळलेलं आहे. बिपिन रावत यांच्यावर देशाच्या संरक्षण विभागाची महत्वाची जबाबदारी होती. त्यांच्या निधनाने येई खूप मोठी पोकळी अचानक निर्माण झाल्याने यावर तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष ते खाली बैठक बोलवलेली आहे.
ज्यामध्ये जनरल बिपिन रावत व पत्नी मधूलिका रावत यांच्या समवते निधन पावलेल्या 13 जणांच्या वर शोक भावना व्यक्त केली जाईल. याआधी सोशल मीडियावर अनेकांनी जनरल यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिल्या आहेत. कारण ते एक परिचित असे अधिकारी होते. विंग कमांडर पृथ्वी राज चौहान हे त्या हेलिकॉप्टरचे पायलट होते. ज्या हेलिकॉप्टरचे नाव आहे mi 17V5.
घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हंटलं की नेमकं घटना कशी घडली ? घटने आधी व नंतर ची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर उद्या किंवा योग्य वेळी देशासमोर माहिती मांडली जाईल. तामिळनाडू मध्ये घडलेल्या या अपघातात एकूण आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 14 लोकं मृत्यूमुखी पडलेले आहेत. या घटनेची माहिती केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांना सेना प्रमुख जनरल नरवणे यांनी दिली.