केंद्रीय आरोग्य मंत्रालया कडून शुक्रवारी सांगण्यात आले की कोविड 19 च्या ओमिक्रॉन प्रकारावर सध्याची लसी काम करत नसल्याचा कोणताही पुरावा नाही. आणि, आढळलेल्या काही म्युटेशन मुळे लसीची परिणामकारकता काही प्रमाणावर कमी होऊ शकते. हा कोरोनाचा नवीन प्रकार रोगप्रतिकारक शक्तीवर किती परिणाम करतो याबद्दल अजून कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्नांची यादी प्रसारित केली आहे ज्याला WHO ने ‘वैरिएंट ऑफ कंसर्न’ म्हणून संबोधले आहे. गुरुवारी कर्नाटकात ओमिक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत.
सध्याच्या लसी ओमिक्रॉनच्या विरूद्ध कार्य करतात की नाही यावर स्वास्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या लसी ओमिक्रॉनच्या विरूद्ध कार्य करत नसल्याचा कोणताही पुरावा नसला तरी, काही म्युटेशन लसींची प्रभावीता कमी करू शकतात. प्रतिकारशक्ती द्वारे आपल्या शरीराचे संरक्षण केले जाते.त्यामुळे लसिकर करणे खूप गरजेचे आहे सर्वांनी लस घ्यावी असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोविड १९ ची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेवर मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण आफ्रिका देशांतून ओमिक्रॉनची प्रकरणे झपाट्याने समोर येत आहेत आणि त्याची लक्षणे पाहता ते भारतासह आणखी देशांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. तथापि, प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण आणि तीव्रताअद्याप अस्पष्ट आहे.
त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर लसिकर करून घ्यावे जेणेकरून आपल्यासह दुसऱ्यांचे संरक्षण आपण करू.