Thursday, August 18, 2022

धक्कादायक ! या व्यक्तीने लँडिंग गियर वर बसून केला तब्बल अडीच तासांचा विमानप्रवास..

लहानपणीच्या आयुष्यात खेळता खेळता मोठ्याने आवाज करत भुर विमान जायचे तेव्हा मोठ्यापणी एकदा तरी त्या विमानात बसायचं अशी स्वप्न अनेकांनी बाळगून ठेवली असतील. काहींनी ती पूर्ण देखील केली असतील. ज्यांनी पूर्ण केली त्यांनी आयुष्यातला पहिला विमान प्रवास लक्षात रहावा यासाठी खूप काही केलं असेल आणि ज्यांनी अजून प्रवास केला नसेल त्यांनी प्लॅनिंग तरी किमान केलं असेल.

पण आता या सर्वांमध्ये जगावेगळी प्लॅनिंग किंवा धोकादायक असा विमान प्रवास केलेल्या व्यक्ती बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कारण सध्या सोशल मीडियावर जगाच्या त्याचीच चर्चा चालू आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

काय झालं होतं की एका व्यक्तीने नुकताच अमेरिका येथून म्हणजे न्यूयॉर्क टाईम्स च्या वृत्तानुसार गवाटेमाला ते मियामी हा जवळपास तब्बल 3 तासांचा विमान प्रवास लँडिंग गियर वर बसून केलेला आहे. झाले ना हैराण ? पण ही बातमी खरी आहे. हे फोटो न्यूयॉर्क एयरलाईन्स चे आहेत. जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आता अनेकांना हाच प्रश्न पडला आहे की त्यावर लँडिंग गियर वर बसायची वेळ का आली ? त्याचं काय कारण असावे ? बरं तिकिट होतं तर आत का नाही ? आणि नव्हतं तर मग विमानतळ येथे कसकाय एन्ट्री केली ? वगैरे वगैरे. त्याचे अजून काही सविस्तर असे उत्तरं आलेली नाहीत की ती व्यक्ती कोण व हा असा धोकादायक असा प्रवास क त्याने अनुभवला.

तब्बल 2 तास 30 मिनिटं हे विमान हवेत होतं. प्रचंड उंच अश्या अंतरावर. तिथं गारठा ही खूप होता. अश्या परिस्थितीत वाचणं नशीब आहे. या व्यक्तीला लँडिंग गियर वर बसताना कुणीच पाहिलं नाही. पण प्लेन लँड झाल्यावर तेथील एका कर्मचारी वर्गाने हे दृश्य पाहिलं. तो व्यक्ती पूर्ण पणे गारठून गेला होता.

पण हे मात्र खरं की तो थोडा सुद्धा हलला नव्हता. त्याला नंतर रुग्णालयात हलविण्यात आलेलं आहे. त्याची तब्येत सध्या ठीक आहे. पण ही बातमी वाचणाऱ्याला एक कळकळीची विनंती करण्यात येत आहे की असे धोकादायक प्रकार आयुष्यात कधीच करू नका. सुखी रहा, मस्त राहा.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -