Thursday, August 18, 2022

IPS दबंग महिला अधिकारी व प्रसिद्ध अभिनेत्री अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या यांच्या नावाने थरथर कापतात गुन्हेगार !…..

संघर्ष हा सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेला असतो. पण जो संघर्ष करून, अभ्यास करून मोठा होतो त्याचा समाजात एका वेगळ्याच प्रकारचा दरारा असतो. आज आपण एका दबंग अधिकारी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची गोष्ट ही इतरांसाठी, नव्याने तयारी करणाऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरत असते. या सर्वांमध्ये त्यांची मेहनत आणि समर्पण असतं. आयपीएस अधिकारी सिमला प्रसाद यांचीही अशीच संघर्षाची खडतर वाट तुडवून उभी असलेली एक गोष्ट आहे.

कुठे झाला होता जन्म ?

सिमला प्रसाद यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1980 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला होता. त्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. सिमला नक्षलग्रस्त भागात त्यांच्या बेधडक अश्या शैलीसाठी ओळखली जात होत्या.

सिमला प्रसाद एक दबंग अधिकारी !…

आयपीएस अधिकारी सिमला प्रसाद , या बरकतुल्ला विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर झालेल्या आहेत. त्यांनी सेंट जोसेफ कोएड स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. पुढे यानंतर त्यांनी ‘स्टुडंट फॉर एक्सलन्स’मधून बी.कॉम केले आणि नंतर भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठातून समाजशास्त्रात पीजी केले. ज्यामध्ये त्या सुवर्णपदक विजेत्या राहिलेल्या आहेत.

त्यांनी कुठं कुठं आणि कोणत्या पदावर काम केलेले आहे ?

सिमला प्रसाद यांनी डीएसपी म्हणून पदावरही काम केले आहे, आयपीएस होण्यापूर्वी, सिमला यांना पीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, डीएसपी म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली होती. त्याच वेळी म्हणजेच 20210 मध्ये त्या UPSC परीक्षा उत्तीर्ण करून आणि IPS अधिकारी (सिमला प्रसाद IPS) बनल्या होत्या. आयुष्यातला यशस्वी दिवस म्हणजे हाच.

सिमला प्रसाद यांनी हा संघर्ष मय यशस्वी प्रवास सगळा काही अभ्यासाच्या
जोरावर यश मिळवून डीएसपी पदावरपर्यंत चा प्रवास पूर्ण केला आहे. पहिल्याच प्रयत्नात स्वयंअध्ययन करून त्या Upsc परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

अधिकारी आणि अभिनेत्री अश्या दुहेरी भूमिका..

अलिफ या चित्रपटात सिमला प्रसाद यांनी शम्मीची भूमिका साकारली आहे. मदर टेरेसा यांच्या प्रेरणादायी शाळेची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट शिक्षणाचे महत्त्व चांगल्या पद्धतीने मांडणारा आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये क्वीन्सलँडच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रदर्शित सुद्धा झाला होता.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -