Friday, August 12, 2022

अहमदनगर मधील शासकीय सिव्हील हॉस्पिटल मध्ये भयानक आग !.. १० जण मृत्यूमुखी तर १४ जण जखमी…

अहमदनगर: अहमदनगर मधील शाशकीय सिव्हील हॉस्पिटल मधील ICU वार्ड मध्ये भीषण आगीचे वृत्त आले आहे हि आग आज सकाळी ११.३० च्या सुमारास लागल्याचे कळत आहे. या आगीत १० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर १३ ते १४ जण जखमी झालेले आहेत.

आगीत जखमी लोकांवर दुसऱ्या दवाखान्यात उपचार सुरु केलेले आहेत, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी व स्थानिक नागरिकांनी व अग्निशमन दलाने ही आग विझावल्याचे सांगितले जात आहे.

आज (शनिवार) सकाळी ११.३० वाजता हि भयानक आग दवाखान्याच्या ICU विभागाला लागली आहे. तेव्हा ICU विभागात २० रुग्ण होते त्यातील काही व्हेंटीलेटर वर सुद्धा होते. दवाखान्यातील वार्ड बॉय, रुग्णसेविका यांच्या मदतीने काही रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. ICU वार्ड रुग्णालयाच्या मध्यभागी आहे व तिथेच आग लागली आहे.

प्रथम आग लागल्यानंतर रुग्णालयातील आग विझवण्याच्या सामग्रीने आग विझवण्याचे प्रयत्न केले गेले परंतु आग आटोक्यात आली नाही नंतर अहमदनगर पालिकेच्या व MIDC च्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी पोहचून आग विझवण्यात यशस्वी झाले आहेत.

या सर्व घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सिव्हील हॉस्पिटल मध्ये लागल्याल्या आगीत जीवित हानी मुळे दुखः झाले. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रथना करतो. व पीडित कुटुंबियांना सांत्वना.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -