Wednesday, August 17, 2022

परदेशातल्या एका इंग्रजाशी लग्न करून सुद्धा भारतीय संस्कृती विसरली नाही ही अभिनेत्री ! साजरी केली नवऱ्या सोबत दिवाळी…

बॉलिवूड जगतात असे अनेक सुपरस्टार आहेत की ज्यांनी परदेशात सेटल होणं पसंत केलेलं आहे. पण आपल्याला हे माहिती आहे का ? परदेशात जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या भारताची संस्कृती काही सोडली नाही. मराठी आणि हिंदी अभिनेत्री अश्विनी भावे या सुध्दा अमेरिकेत राहत असतात; पण त्यांच्या मनातील भारतीय संस्कृती काही अजूनही गेली नाही.

त्या तिकडं राहून सुद्धा अनेक भारतीय सण आनंद उत्स्फूर्तपणे साजरा करत असतात. ज्यामध्ये दुसरं एक नाव आहे ते म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा चं. होय अभिनेत्री ने निक जोनस सोबत लग्न करून तिकडेच आयुष्य सेटल केलं आहे. पण तिने भारतीय सण साजरे करायचं कधीच विसरलेलं नाही.

परदेशात राहणाऱ्या प्रियांकाने दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. लक्ष्मी पूजन सुद्धा खूप आनंदाने साजरे केले आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघेही पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत आहेत. ज्यात प्रियांका आणि निक खूप सुंदर दिसत आहेत.

प्रियांकाने पिवळ्या रंगाची सुंदर अशी नक्षीची साडी घातली आहे तर निकने पांढरा कुर्ता व पायजमा घातला आहे. हातात पूजेचे ताट घेऊन दोघेही लक्ष्मीची पूजा करताना दिसत आहेत. तिकडचं त्यांचं लक्ष्मी पूजन पाहून चाहत्यांना इकडं मनाला खूप भारी वाटत असेल.

प्रियांका चोप्रा या सुप्रसिद्ध अभिनेत्री ने त्यांच्या लक्ष्मी पूजनाचा हा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रुपेन संस्थता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तै नमो नमः’

फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले. चाहत्यांच्या पर्यंत पोहचले. तेव्हापासून चाहते प्रियंका आणि निकला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडिया यूजर्स प्रियांका चोप्रा चे कौतुक, अभिनंदन करताना म्हणत आहेत की, ” देशापासून दूर राहून आणि एका इंग्रजाशी लग्न करून सुद्धा ती तिचे संस्कार आणि चालीरीती विसरलेली नाही. हे खरच खूप अभिमान स्पद आहे.

प्रियांकाचे कोणकोणते प्रोजेक्ट्स येणार आहेत ?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही लवकरच Amazon Prime च्या वेब सीरीज ‘Citadel’ मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती ‘टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूड चित्रपटातही काम करत आहे. ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. तर प्रियांका चोप्रा आई शीला आनंद यांच्या बायोपिक आणि ‘काउबॉय निन्जा वायकिंग’मध्येही दिसणार आहे. तर असे आहेत तिचे येणारे काही प्रोजेक्ट.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -