Wednesday, August 17, 2022

समीर वानखेडे यांच्या बहिणीने घेतली राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव ! लिहिलं पत्र….

आर्यन खान ड्रग्स प्रकरण आधी शाहरुख खान भोवती फिरत होतं; पण आता तर यामध्ये एक वेगळंच वळण आलेलं आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील हिंदू की मुस्लिम यावर खूप चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी मंत्री नवाब मलिक यांनी जातीचा दाखला ट्विटर वर ट्विट करत या चर्चेत धक्कादायक वळण आणलेलं आहे.

अश्यात समीर वानखेडे यांची बहीण वर सुद्धा नवाब मलिक यांनी आरोप केले. त्यामुळे आता बहिणीने राष्ट्रीय महिला आयोगा कडे धाव घेतलेली आहे. नक्की काय घडलं आहे चला सविस्तर जाणून घेऊ.

आत्ता पर्यंत आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नक्की काय काय घडलं ?

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचा फेरा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक रोज नवनवे खुलासे करत आहेत. कुटुंबीयांना या प्रकरणात ओढण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. आता समीर वानखेडेची बहीण यास्मिन वानखेडे हिने नवाब मलिकवर जोरदार प्रहार केला आहे. 

गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे..

यास्मिन यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे . यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. 

उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी करण्यास नकार दिला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नवाब मलिक यांना अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विरुद्ध कोणतीही टिप्पणी न करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका तातडीने ऐकण्यास नकार दिला आहे . मुंबईचे रहिवासी कौसर अली यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. व्यसनींच्या पुनर्वसनासाठी तो काम करतो असा अलीचा दावा आहे. आता पुढे ही बरेच काही झालं.

आर्यन खान प्रकरणाशी संबंधित एनसीबी किंवा इतर कोणत्याही तपास संस्थेच्या अधिकार्‍यांविरुद्ध कोणतीही टिप्पणी करू नये, असे आदेश देण्याचे त्यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली.

याचिकाकर्त्यांचे वकील अशोक सरोगी यांनी सरन्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या खंडपीठाकडे तातडीने सुनावणीची मागणी केली. परंतु उच्च न्यायालयाने सरोगी यांना सुट्टीतील खंडपीठाकडे जाण्यास सांगितले.

आता या प्रकरणात नेमकं काय काय पाहायला मिळतंय ? नेमकं आर्यन खान सुटेल का उलट हेच प्रकरण जास्त भरकटल हे पाहणं बाकी आहे. लक्ष ठेवू या प्रकरणी आम्ही. आपल्याला माहिती देण्यासाठी.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -