Wednesday, August 17, 2022

आज बाळासाहेब असते तर…क्रांती रेडकर चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र. सोशल मीडियावर होतय व्हायरल…

क्रांती रेडकर ही NCB झोनल मुंबई डायरेक्टर समीर वानखेडे यांची पत्नी. तिने आज ट्विटर वर मराठी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.

इमोशनल असलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. हे पत्र काय आहे ? किंवा इथपर्यंत हे प्रकरण नेमकं कसं पोहचलं चला हे सगळं जाणून घेऊयात सविस्तर…

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांच्यावरील आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र लिहून न्यायाची याचना केली आहे.

क्रूझ पार्टी ड्रग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलेच्या प्रतिष्ठेशी खेळलं जात आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर हा प्रकार घडला नसता.

नवाब मलिक यांच्या घणाघाती आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती राडकर वानखेडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, ‘ते (बाळासाहेब) आज नाहीत पण तुम्ही आहात. आम्ही त्यांना तुमच्यामध्ये पाहतो, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. मला खात्री आहे की तुम्ही माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. एक मराठी म्हणून मी तुमच्याकडे न्यायाच्या आशेने पाहत आहे. मी तुम्हाला न्याय मागतेय. आम्हाला न्याय द्या.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक हे समीर वानखेडेवर सातत्याने नवनवे आरोप करत आहेत. कधी ते त्यांच्यावर बनावट कास्ट सर्टिफिकेटवर नोकरी केल्याचा आरोप करत आहेत तर कधी निकाहनामा काढत आहेत. त्याचसोबत कुटुंबातील सदस्यांवर ही आरोप केले जात आहेत. या आरोपांमध्ये समीर वानखेडेची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर सतत पतीचा बचाव करत आहे.

याआधी बुधवारी समीरची पत्नी क्रांती रेडकर प्रेस कॉन्फरन्स द्वारे म्हणाली होती की, तिचा नवरा जन्मतः हिंदू होता आणि त्याने कधीही धर्म बदलला नाही. 2006 मध्ये समीर वानखेडेचा पहिला विवाह लावणाऱ्या काझींनी केलेल्या दाव्यालाही क्रांती रेडकर यांनी विरोध केला, ज्यात काझींनी निकाहाच्या वेळी समीर मुस्लिम असल्याचे म्हटले आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलेल्या हाय-प्रोफाइल क्रूझ ड्रग्ज प्रकरणात खंडणीच्या आरोपानंतर वानखेडे राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

समीर विभागीय दक्षता चौकशीला सामोरे जात आहे. 2017 मध्ये समीर वानखेडे यांच्याशी विवाह केलेल्या क्रांती रेडकरने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेत म्हटले की, मलिक तिच्या पतीवर खोटे आरोप करून निकृष्ट दर्जाचे राजकारण करत आहे. करत आहेत. आम्हाला राजकारण येत नाही. त्यात पडायचं सुद्धा नाही. शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. सत्यमेव जयते.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -