महावीकास आघाडी सरकारचे राज्याचे मंत्री नवाब मलिक रोज समीर वानखेडेवर नवनवीन आरोप करत आहेत. नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडे यांच्या लग्नाबाबत एक फोटो व लग्नाचे प्रमाणपत्र सादर केले आहे, समीर वानखेडे यांनी 2006 मध्ये मुस्लिम रिवाजाप्रमाणे एका मुस्लीम मुलीशी लग्न केले होते. नवाब मलिक यांनी आज सकाळी 6.25 वाजता ट्विट केले की समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा विवाह 7 डिसेंबर 2006 रोजी रात्री 8 वाजता लोखंड वाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) मुंबई येथे झाला.
मी हे प्रकरण धर्मासाठी नाही तर वानखेडेच्या पोलखोलीसाठी मांडत आहे:
नवाब मलिक यांनी या प्रकरणी आणखी एक ट्विट केले आहे, समीर दाउद वानखेडे हा ओपन कॅटेगरीत असून सुद्धा त्याने बनवट SC जात प्रमाणपत्र मिळवून एका दलित मुलाची फसवणूक केली आहे व त्याची जागा घेतली आहे. त्यांनी कोणत्या फसव्या मार्गाने जात प्रमाणपत्र मिळवले आहे हे मला समोर आणायचे आहे.
मंगळवारीही मलिक यांनी वानखेडे यांच्यावर मोठा आरोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर दलितांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप केला होता. फसव्या पद्धतीने नोकरी मिळवणे. वानखेडे यांनी बनावट जन्म आणि जात प्रमाणपत्र तयार करून नोकरी मिळवली, असे मी पुन्हा एकदा सांगत असल्याचे मलिक म्हणाले होते. ते म्हणाले की, ज्या व्यक्तीला बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जाती प्रवर्गात नोकरी मिळते, तो एका दलित व्यक्तीचा जो कुठेतरी झोपडीत किंवा पथदिव्याखाली शिकणाऱ्याचा हक्क हिरावून घेतला आहे. एवढेच नाही तर आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी समीर वानखेडे व त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटोही ट्वीट केला आहे. मात्र, वानखेडे यांच्या पत्नीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल.
दुसरीकडे, मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी आणि झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य खचवण्यासाठी कोणतीही टिप्पणी करू नये, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अंधेरी (पू) येथील व्यापारी आणि मौलाना कौसर अली सय्यद यांनी ही याचिका दाखल केली आहे. मलिक यांच्या ट्विटचा संदर्भ देत जनहित याचिका मध्ये मांडण्यात आले आहे की मलिक हे समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमचे मनोधैर्य खचवण्यासाठी खोटे विधानं करत आहेत.