Sunday, October 2, 2022

आर्यन खान ला आज जामीन मिळणार का ? NCB वकील आणि सतीश माने शिंदे यांनी आखली रणनीती !…..

सध्या मनोरंजन क्षेत्रात आर्यन खान ड्रग्स प्रकरण खूप चर्चेत आलेलं आहे. त्यामध्ये समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जातायत. राष्ट्रवादी नेते नि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून.

तर त्याचं प्रत्युत्तर ही वानखेडे कुटुंबातील सदस्यांकडून दिले जात आहे. अश्यात मात्र शाहरुख खान चा मुलगा आर्यन ला जामीन मिळेल का ? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मिळेल का नाही हे जाणून घेऊया चला खालील माहिती मध्ये.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ऑर्थर रोड वरच्या तुरुंगात आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि विशेष एनडीपीएस कोर्टाने यापूर्वीच त्याचा जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळला आहे. आता आर्यन च्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. जामीन मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष न्यायालयाने 20 ऑक्टोबर रोजी याचिका फेटाळल्यानंतर, सतीश मानेशिंदे यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या कायदेशीर पथकाने उच्च न्यायालयात धाव घेतली,

मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे मान्य केले. मात्र, येथेही सुनावणीदरम्यान आर्यन खानसह सर्व आरोपींच्या जामिनाला एनसीबी विरोध करणार आहे. का ? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

एनसीबी जुने प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे असे म्हंटलं जात आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामिनाच्या सुनावणीपूर्वी एनसीबीचे वकील सोमवारी सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेली दोन्ही प्रतिज्ञापत्रे उच्च न्यायालयासमोर ठेवण्याची शक्यता आहे.

एक शपथपत्र असं आहे की ज्यामध्ये NCB उच्च न्यायालयाला सांगेल, ” साक्षीदार आणि पंचनामा करणाऱ्यांवर कसा प्रभाव पडतो. आणि कसा जवाब बदलला जातो.

अश्यात या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे यांना कशाप्रकारे धमकावले जात आहे, हे न्यायालयात NCB कडून सांगितले जाणार आहे.

या सर्व गोष्टींबाबत एनसीबीचे अधिकारी मंगळवारी त्यांच्या वकिलांची भेट घेणार असून, त्यानंतर अंतिम रणनीती ठरवली जाणार आहे.

आत्ताच्या ताज्या माहितीनुसार, आर्यन खानची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात 57 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, सहआरोपी अरबाज मर्चंटचा जामीन अर्ज ६४ व्या क्रमांकावर आहे. या प्रकरणातील आर्यन खानसह सर्व आरोपींच्या जामीनाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आज उच्च न्यायालयात विरोध करणार आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -