Tuesday, September 27, 2022

म्हणून सौरभ गांगुलीला भेटायला गेलेल्या आमिर खान ला सुरक्षा रक्षकाने गेटवरच अडवलं ! व्हिडीओ होतोय व्हायरल….

एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर कुण्या सुपरस्टार व्यक्तीला भेटीस त्याच्या घरी गेला तर साहजिकच आतमध्ये जाण्यास त्याला प्रवेश मिळूच शकत नाही. पण त्याचवेळी जर एक सुपरस्टार दुसऱ्या सुपरस्टार व्यक्तीला भेटायला गेला आणि त्याला सुरक्षा रक्षकाने अडवलं तर मग ? जाणून घेऊया खालील लेखात हाच घडलेला एक किस्सा दोन प्रसिद्ध वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती मधला…

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या आयुष्याशी संबंधित असे अनेक किस्से आहेत, जे जाणून लोकांना आश्चर्याचा चांगलाच धक्का बसेल. ज्यामध्ये एक किस्सा असाही आहे की जेव्हा तो सौरव गांगुलीला भेटण्यासाठी त्याच्या कोलकाता येथील घरी पोहोचला होता. पण तेव्हा मात्र सुरक्षा रक्षकाने त्याला आतही जाऊ दिले नाही. आमिर खान सुरक्षा रक्षकाची विनवणी करत राहिला, पण त्याला सौरव गांगुलीच्या घरात प्रवेश मिळू शकला नाही.

आमिर खान एक चाहता म्हणून सौरव गांगुलीच्या घरी पोहोचला…

मागे काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खान चाहत्याच्या वेशात सौरव गांगुलीच्या घरी पोहोचला होता. भेटण्यासाठी. लांब केस, काळा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला, डोळ्यावर चष्मा घातलेला आमिर खान पूर्णपणे बंगाली लूकमध्ये दिसत होता.

या लूकमध्ये तो पहिल्यांदा कोलकात्याच्या रस्त्यांवर फिरताना दिसला होता. विशेष म्हणजे आमिर खानला भेटल्यानंतर सुद्धा अनेक लोक ओळखू शकले नाहीत. ज्यामध्ये सुरक्षा रक्षकाचा ही नंबर येतोच.

आमिर खान सौरव गांगुलीच्या घराबाहेर कोलकात्यातील स्थानिक लोकांना त्याचा पत्ता विचारत पोहोचला होता. दादांच्या घराबाहेर जाऊन त्यांनी सुरक्षा रक्षकाला सांगितले, “हे दादाचे घर आहे का ? ते घरी आहेत, त्यांना भेटायचे आहे. त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढायचा आहे.

सुरक्षा रक्षकाने स्पष्ट नकार दिला होता.

आमिर खानचे म्हणणे ऐकून सुरक्षा रक्षकाने साफ नकार दिला. गार्डने सांगितले की, दादा सध्या घरी नाहीत, ते रणजी सामन्यासाठी जाधवपूरला गेले आहेत. त्यानंतरही आमिर खान तिथून न जाता सुरक्षा रक्षकाला दादांची ओळख करून देण्यास सांगत होता. मात्र सुरक्षा रक्षकाने त्याला घरात प्रवेश दिला नाही.

यानंतर आमिर खानने तेथील स्थानिक लोकांशीही चर्चा केली, मात्र कोणीही त्याला ओळखू शकले नाही. आमिर खानचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

याशिवाय एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये आमिर खान, त्याची माजी पत्नी किरण राव सौरव गांगुलीच्या घरी कुटुंबासोबत बसून जेवणाचा आस्वाद घेताना दिसत होते.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -