Sunday, October 2, 2022

हरल्यानंतर या कारणांमुळे प्रेस कॉन्फरन्स मध्ये भडकला विराट कोहली ! कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल….

काल भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अखेर पाकिस्तान ने भारताला 10 विकेट्स राखून हरवलं आहे. आणि पहिल्यांदा अश्या जागतिक लेव्हल च्या स्पर्धेत पहिल्यांदा हरवलेलं आहे.

या पराभवामुळे भारतीय चाहते खूप नाराज झाले. सामन्या नंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये विराट कोहली काही प्रश्नावर चांगलाच भडकलेला दिसून आला. पण आता या भडकण्याचं कारण समोर आलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर.

T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाला की, भारतीय संघाने 20 ते 25 धावा कमी केल्या. यामुळे आम्हाला पाकिस्तानच्या फलंदाजांवर फारसा दबाव टाकता आला नाही.

म्हणून त्यांनी लक्ष्याचा सहज पाठलाग केला. शाहीन आफ्रिदीने आमच्या फलंदाजांवर दबाव आणला. त्याच्या स्पेलमुळेच आमची फलंदाजी खिळखिळी झाली. नाहीतर बॅटिंग चांगली झाली असती तर नक्कीच धावांचा मोठा डोंगर उभा करून आम्ही जिंकलो असतो.

जेव्हा एका रिपोर्टरने विराटला टीम कॉम्बिनेशनबद्दल प्रश्न विचारला तेव्हा विराट चांगलाच भडकला. तो म्हणाला- हे बघा मला असं वाटतं की मी ज्या संघासाठी खेळलो तो हरला तरी सर्वोत्तम होता. असं कुणाला ही एका मॅच वरून काढून काही होत नसतं. होईल तर फक्त वाद. आम्ही आमचा चांगला खेळ करण्याचा नेहमी प्रयत्न करू.

पाकिस्तानने खूप चांगला खेळ केला.

आम्ही खेळाचा आणि खेळणाऱ्या संघाचा आदर करणाऱ्या संघाचा एक भाग आहोत. त्याचसोबत आम्ही खचणाऱ्यातलो नाहीत. एका सामन्यात हरल्यानं पुढे जिंकणार नाही असं थोडीच ये. जे जिंकले ते चांगले खेळले. त्यांचा आदर आणि अभिनंदन. आता आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जाऊ.

पाकिस्तान आज आमच्यापेक्षा चांगला खेळला. त्यामुळे, त्यांना श्रेय देणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, पण पाकिस्तान ने खूप चांगला खेळ खेळला. प्रत्येक सामना आम्ही खेळू आणि जिंकू याची शाश्वती नाही. आम्ही आमच्या स्थितीनुसार चांगले गुण मिळवले आहेत.

पुढे कोहली म्हणाला, जर आमच्याकडे आणखी 20-25 धावा असत्या तर आम्हाला फायदा झाला असता. पण पाकिस्तानच्या गोलंदाजीने आम्हाला जास्त धावा करण्याची संधीच दिली नाही.

म्हणूनच नाणेफेकही महत्त्वाची भूमिका बजावत असते. बघू पुढचे सामने उत्तम खेळू आणि जिंकायचा प्रयत्न करू…

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -