Sunday, October 2, 2022

T20WC:“आजचा विजय हा इस्लाम धर्माचा विजय आहे” पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा केलं वादग्रस्त विधान..

काल झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. भारतातील अनेक दिग्गजांनी पाकिस्तान क्रिकेट संघाने चागला खेळ दाखवला म्हणून त्यांची पाठ थोपटली, परंतु पाकिस्तान क्रिकेट संघाच्या विजयानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. रशीदने क्रिकेटला खेळला धर्माशी जोडले आहे आणि कालच्या विजयाला इस्लामचा विजय म्हटले आहे.

टी -20 विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने प्रथमच भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. याबाबत पाकिस्तानात जल्लोषाचे वातावरण आहे. लोक एकमेकांचे अभिनंदनही करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही या विजयाबद्दल संघाचे अभिनंदन केले, मात्र त्यांच्या एका मंत्र्याने बालिश आणि हास्यास्पद विधान केले आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा धर्माबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी पाकिस्तानी संघाचा विजय हा इस्लामचा विजय असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, भारत-पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना असून काही कारणास्तव मी मैदानात पाहू शकलो नाही, याचे मला दु:ख आहे, मात्र मी इस्लामाबाद, रावळपिंडीकडे जाणाऱ्या सर्व मालवाहतूक करणाऱ्यांना रस्त्यावर ठेवलेले कंटेनर हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून सर्व पाकिस्तानी जनता उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू शकेल. सध्या पाकिस्तानातील कट्टर टीएलपी समर्थकांनी केलेल्या दंगलीमुळे इस्लामाबादकडे जाणारे रस्ते बंद आहेत.

शेख म्हणाला की, “पाकिस्तानच्या संघाला आणि पाकिस्तानी जनतेला जीत मुबारक. आज आमची फायनल होती. होय आजचं आमची फायनल होती. पाकिस्तान झिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद!”
“जगातील मुस्लिमांसह भारतातील मुस्लिमांच्या भावनाही पाकिस्तानी संघासोबत असल्याचे सांगत शेख यांनी एक हास्यास्पद विधान केले.

त्याचबरोबर पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 2021 च्या टी -20 विश्वचषकात भारतावर विजयाचे अभिनंदन केले आहे. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीही संघाच्या उत्कृष्ट खेळाबद्दल आनंद व्यक्त केला.

सुपर 12 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर 10 विकेट्सने मात केली. विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी झालेल्या 12 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. 1992 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार इम्रान खानने ट्विट केले की, ‘पाकिस्तान संघाचे आणि विशेषत: बाबर आझमचे अभिनंदन, ज्यांनी संघाचे नेतृत्व केले. यासह, रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन. देशाला तुमचा अभिमान आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -