Wednesday, September 28, 2022

बायकोच्या चरित्रावर घ्यायचा रोज संशय.रागाच्या भरात तिचा गळा चिरला आणि स्वतःला फासावर लटकावलं !….

नवरा बायकोचं नातं हे खूप वेगळं असतं. जीवाला जीव देणारं असतं. आयुष्य भर पुरून उरणारं असतं. पण या अश्या नात्यात काल काळिमा फासणारी घटना दिल्ली मध्ये घडलेली आहे. नवऱ्याने चारित्र्य संशयास्पद होऊन बायकोला जीवे मारून टाकलेलं आहे. नेमकी घटना काय आहे, चला जाणून घेऊयात सविस्तर.

करवा चौथच्या आदल्या दिवशी पत्नीसोबत फेऱ्या मारत सात जन्म सोबत ठेवण्याचे आश्वासन देणाऱ्या दिल्ली तील एका व्यक्तीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे.

बरं इथपर्यंत प्रकरण थांबलेलं नाही तर या घटनेनंतर आरोपीने स्वत: लाही फासावर लटकवले आहे. सकाळी जेव्हा महिलेचा भाऊ घरी पोहचला तेव्हा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. जेव्हा त्याने खिडकीतून डोकावून बघितलं, तेव्हा आतले दृश्य पाहून भावाला धक्का बसला.

ही खळबळजनक अशी घटना पूर्व दिल्लीच्या न्यू अशोक नगर भागात घडली. सोनी ( वय 35) आणि तिचा पती धर्मेंद्र ( वय 40) अशी मृतांची नावे आहेत. मृत झालेल्या कडून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे कारण फारसं ठोस असं काही समोर आलेलं नाही.

सोनी या महिलेचा मृतदेह खोलीतल्या बेडवर पडलेला होता. तसेच, धर्मेंद्र खोलीत पंख्याला लटकलेला होता. औपचारिक चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात पोस्टमोर्टमला पाठवला.

रविवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. प्राथमिक तपासानंतर, पोलिसांना समजले आहे की धर्मेंद्र त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे रागात त्याने हा गुन्हा केला असावा असा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र बायको कुटुंबासह न्यू अशोक नगर येथील बी-ब्लॉकमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी सोनी शिवाय तीन मुले आहेत.

धर्मेंद्र चा 11 वर्षांपूर्वी सोनीशी विवाह झाला होता. धर्मेंद्र नोएडामध्ये इलेक्ट्रिकलचे काम करायचा. त्याचवेळी सोनी नोएडामध्येच एका हॉस्पिटलमध्ये काम करायची. सोनीचे मामा तिथेच राहायला आहेत. घराचा आकार लहान असल्याने सोनी रोज मुलांना तिच्या माहेरी झोपण्यासाठी पाठवत असे. तेही माहेरी चहा प्यायला नवरा बायको जवळ असल्यानं रोज जात असत.

ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी, सकाळी सोनी आणि धर्मेंद्र चहा प्यायला आले नाहीत, म्हणून बोलावण्यासाठी सोनीचा भाऊ दीपक बहीण आणि मेहुण्याला भेटायला घरी गेला. तेथे पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेकवेळा ठोठावल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने दीपकने खोलीच्या खिडकीतून डोकावून बघितलं. तेव्हा त्याला धक्काच बसला. धर्मेंद्र पंख्याला लटकत होता आणि सोनी बेडवर बेशुद्ध पडली होती. तो घराकडे धावला. यानंतर हे प्रकरण पोलिसांना कळवण्यात आले.

पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्राईम पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सोनी बेडवर मेलेली होती. तिच्या मानेवर खुणा होत्या. तिची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. सध्यातरी चौकशी अंती धर्मेंद्र आणि सोनी यांच्याकडून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.

धर्मेंद्र आणि सोनी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत होते, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा भांडण झाल्यानंतर धर्मेंद्रने पत्नीची हत्या करून हा गुन्हा केल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -