काय सांगता ! आर्यन खान चौकशी मध्ये, “या” कारणांमुळे नुसतं ढसाढसा रडतोय…

0
372

बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान आणि मुलगा आर्यन खान या दोघा बापलेकांचे अटक झाल्यापासून फोनवर बोलणं होत नव्हतं. कारण NCB मे फोन जप्त केलेला होता. पण आता दोघांचे बोलणं झाल्याची गोष्ट समोर आलेली आहे.

एका मीडिया वृत्तानुसार शाहरुख खान आणि मुलगा आर्यन यांचे फोनवर बोलणं झालं आहे. रेव्ह पार्टी दरम्यान NCB च्या समीर वानखेडे व टीम ने आर्यन सोबत इतरांना रंगेहाथ पकडलेले आहे. NCB ने केलेल्या अटकेनंतर कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत लँडलाईन वरून केवळ 2 मिनिटांचं बोलणं अभिनेता शाहरुख खान आणि मुलगा आर्यनचं बोलणं झालं आहे.

आर्यन रडत आहे ?

बॉलिवूड किंग खान चा मुलगा आर्यन खान सध्या तारुण्य वयात आहे. त्यामुळे त्याला असं काही होईल ड्रग्स रेव्ह पार्टी दरम्यान जन्मात ही वाटलं नसेल. त्यामुळे चौकशी दरम्यान घाबरून तो सतत रडत आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुलगा आर्यन खान हा मागील तब्बल 4 वर्षांपासून ड्रग्स घेत असल्याचं समोर येत आहे. म्हणजे खूप युवा वयात त्याला हे अमली पदार्थांचे व्यसन लागलेलं आहे. कस्टडीच्या चौकशीत या व्यतिरिक्त अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. विशेषतः आर्यन याने फक्त भारताच नाहीतर बाहेरच्या देशात म्हणजे युके, दुबई आणि इतर देशात सुद्धा ड्रग्सचं सेवन केलं असल्याचं समोर आलेलं आहे.

शाहरुख खान आणि सलमान भेट !..

आर्यन ला अटक झाल्याचं कळताच शाहरुख खान ने पठाण सिनेमाचं शूटिंग स्थगित केलेलं आहे. त्याचबरोबर रात्री काल 11 वाजता सलमान खान ही भेटीला गेला होता. जो व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. कारण दोघे फार कधी सोबत एवढ्यात दिसले नाही; पण काल होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ?

या प्रकरणावर बोलताना अजित पवार प्रसार माध्यमांशी जरा स्पष्टच बोलले. ते म्हणाले, मुलगा कुणाचाही असो कायदा सर्वांना सारखा आहे.

Leave a Reply