यूपीएससी म्हणजे देशातील प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च स्पर्धा परीक्षा. ज्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाचे खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात. तर काल त्या परीक्षेच्या मुख्य चा निकाल लागला आहे.
अनेकांच्या संघर्षाला यश मिळालेलं आहे. छत्तीसगड मधील एका शेतकऱ्याचा मुलगा खूप कष्टाने उत्तीर्ण झाला आहे.
यूपीएससीने नागरी सेवा २०२० चा मुख्य परीक्षाचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत शुभम कुमारने अव्वल स्थान पटकावले आहे. यूपीएससीनुसार जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी नागरी सेवा परीक्षेत द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवले आहे.
यासोबतच छत्तीसगडच्या आकाश श्रीश्रीमलनेही यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशाची मने जिंकली आहेत. आकाश श्रीश्रीमल यांना देशात ९४ वा क्रमांक मिळाला आहे. हेही नसे थोडके.
केंद्रीय लोकसेवा आयोग, UPSC ने नागरी सेवा परीक्षा २०२० (UPSC २०२० परीक्षा) चा निकाल जाहीर केला आहे.
छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातील २५ वर्षीय कवर्धा येथील आकाश श्रीश्रीमल यांनी देशात 94 वा क्रमांक मिळवला आहे.
एवढ्या कमी वयात आभाळाएवढं यश मिळवणं सोपं नसतं काही; पण यांनी करून दाखवलं आहे. परिस्थिती किती खडतर आहे, याचा न्यूनगंड न बाळगता जिद्दीने कसं लढता येतं याचं एक हे उत्तम उदाहरण आहे. सलाम !
अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा !..