Wednesday, September 28, 2022

कडक सलाम ! आई वडिलांनी घर गहान ठेवलं; पण पोराला शिकवलचं. आणि पोरानेही IAS होईपर्यंत स्वतःला थांबवल नाही…

आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आई वडील काय काय नाय करत. कधी जमीन तर कधी सोनं असेल ती गोष्ट गहाण ठेवायची तयारी आई वडिलांची असते. जगात त्यांच्याशिवाय दुसरा कुणी वाली नाही. खरा गुरु नाही. त्यांच्याच लहानपणाच्या संस्कारापासून मुलगा घडतो आणि पुढे आयुष्यात त्यांच्यासोबत यशस्वी भरारी घेतो. जेव्हा मुलाचे स्वप्न आई वडिलांच्या डोळ्यांदेखत पूर्ण होतात तेव्हा आनंद गगनात मावत नसतो.

आई मी जिल्हाधिकारी झालो ! असं ज्यावेळी एखादा मुलगा घरी जाऊन घरच्यांना सांगत असेल तर हा किती परमोच्च आनंद अभिमान असेल. कुटुंबासाठी, गावासाठी जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असेल. राजेश पाटील या अधिकार्यांनी हे सत्य करून दाखवलेलं आहे. ते आज जिल्हाधिकारी म्हणून सेवेत कार्यरत आहेत.

राजेश पाटील हे जळगावचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांना शिकवण्यासाठी घरच्यांनी घर गहान ठेवलं होतं. त्यांनीही त्यांच्या स्वप्नाला कुठेच तडा न जाऊन देता यश हे मिळवलेच. अत्यंत कठोर मेहनत, अभ्यास दिवस रात्र करून त्यांनी हे यश मिळवलेले आहे.

राजेश पाटील हे कधी झाले जिल्हाधिकारी ?
तर राजेश पाटील हे ओडिशा क्याडर मधून साल २००५ मध्ये झालेले आयपीएस अधिकारी आहेत. आज ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांनी नुकतेच पुस्तक लिहिले आहे, ‘ आई ! मी जिल्हाधिकारी झालो..

ते सध्या कुठे कार्यरत आहेत ?

पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेत आयुक्त म्हणून राजेश पाटील हे सेवा बजावत आहेत. त्यांची परिस्थिती हि जेमतेमच होती. आईवडील शेतकरी होते. त्यामुळे कधी सुगीचे तर कधी दुखाचे दिवस असायचेच. पण तरीही परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता त्यांनी जोमाने वाटचाल करून, संघर्षाच्या खडतर वाटेला तुडवून आज हे यश संपादन केलेले आहे. त्यांच्या या जिद्दीने , प्रेरणेने केलेल्या प्रवासाला सलाम. आणि पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आमचं काम एकच ते म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती पोहचायची. जे काम आम्ही सदैव प्रामाणिक, अखंडपणे करत राहणार. जगात घडणाऱ्या, ” अमुक तमुक ” घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून जलद गतीने बातमी, गोष्टी, किस्से पोहचवण्याच्या प्रयत्नात आहोत.

त्यामुळे आपल्याला हा लेख कसा वाटला ? आवडला का ? हो तर हो नाहीतर नाही. अशी आपल्या मनाची प्रांजळ प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्यावारे नक्की कळवा, व माहिती आवडली असेल तर या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका. कारण आम्हाला यांमुळे आणखी लिहायला प्रोत्साहन मिळतं.धन्यवाद !…

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -