Wednesday, August 17, 2022

बांबूपासून बनवली जगातील पहिली १००% इको फ्रेंडली कार !

सर्जनशीलतेला आज जगात काहीच कमी नाही. प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने जगात चर्चेत येईल असं काही करण्याच्या प्रयत्नात आहे. केरळ मधील इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी सुद्धा अशीच गोष्ट बनवत आहेत. बांबू पासून बनवलेली, इको फ्रेंडली कार.

केरळमधील तिरुअनंतपुरमच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी जगातील पहिली १००% पर्यावरणास अनुकूल असलेली इलेक्ट्रिक कार तयार केली आहे.

ही कार इलेक्ट्रिक आहे तसेच बांबूपासून बनलेली आहे. विद्यार्थ्यांनी शेल इको-मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ही कार बनवली होती.

ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नवीन शोध घेण्यासाठी प्रेरित करत असते. बार्टन हिल या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या पर्यावरणपूरक कारसाठी परिपत्रक अकादमी पुरस्कारही देण्यात आला आहे. ही कार इको-फ्रेंडली मॉडेलचा नमुना आहे.

मॉडेल सुधारण्याचे प्रयत्न –

विद्यार्थी संशोधन टीमचे म्हणणे आहे की कारची चेसिस सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही कार अधिक मॉड्यूलर बनवता येते का तेही पाहिलं जात आहे.

आता दोन आसनी बांबूची गाडी बनवली जाईल. यामध्ये बांबू फ्रेबिक बॉडी आणि बांबू चेसिसचा वापर केला जाईल. रिसर्च टीमचे सदस्य अर्जुन म्हणतात, “ही कार ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वोत्तम नाही, पण इको फ्रेंडली कारही बनवता येते हे सुद्धा एक उत्तम उदाहरण आहे.”

असे आहे इंजिन-

ही इको-फ्रेंडली कार ३५ सीसी आयसी इंजिनद्वारे चालवली जाते, ज्यामुळे इंधनाची बचत होते.

या इको फ्रेंडली कारची संकल्पना बड्या कार कंपन्यांना प्रेरणा देईल असे सांगणाऱ्या टीमचे सदस्य केविन फेलिसियस म्हणतात.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -