Friday, September 30, 2022

१९ वर्षीय “मैत्री पटेल” ची उंच भरारी ! झाली, भारतातील सर्वांत तरुण व्यवसायिक पायलट..

सुरत : “मैत्री पटेल” हिने भारतातील सर्वांत तरुण व्यावसायिक पायलट बनून प्रेरणा दायी इतिहास रचला आहे.

वयाच्या १९ व्या वर्षी गगनाला स्पर्श करणाऱ्या या तरुण पायलटने तिची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक आव्हानाला, संघर्षाला धाडसाने सामोरे जाऊन हे यश प्राप्त केले आहे.

आज “मैत्री पटेल” सारख्या असंख्य भारतीयांचे प्रेरणास्थान बनली आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही मैत्री पटेल ही अमेरिकेत पायलट प्रशिक्षणास गेली.

तिथे तिने ११ महिन्यांतच विक्रमी अभ्यासक्रम पूर्ण केला, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, की जेव्हा ती फक्त आठ वर्षांची होती, तेव्हा तिने पहिल्यांदा विमानाचा पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.

मैत्री पटेल चे बारावी पर्यंतचे शिक्षण भारतात झाले असून तिथून पुढचे शिक्षण म्हणजे “Commercial Pilot” ट्रेनिंग युएस ला झालेलं आहे.

आपला आनंद व्यक्त करताना, मैत्री पटेलच्या पालकांनी हे सर्व कसे घडले ? याबद्दल सांगितले की, ” मैत्रीच्या मुंबईतील ट्रेनिंग व अमेरिकेतील प्रशिक्षणासाठी आम्ही आमची वडिलोपर्जीत जमीन विकली. पटेलचे वडील, कांतीलाल पटेल यांनी अहमदाबाद मिरर या वृत्त संथेला सांगितले की, ते पैसे कमवण्यासाठी सुरत ते मुंबई विमानतळावर प्रवाशांना घेऊन जात असत आणि विमान उडताना आणि उतरताना पाहत असत. तेव्हाच त्यांनी ठरवले की आपली मुलगी पायलट व्हावी आणि तिने जगाचा प्रवास करावा. त्यांनी तिला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही दाखल केले.

आणि मग हळूहळू संघर्षाची गोष्ट सोपस्कर करून मैत्री च्या आई वडिलांनी मुलीच्या यशाची शिखरे सर करण्याकडे लक्ष दिलं. मुलीने सुद्धा आई बापांनी पाहिलेलं स्वप्न स्वतःचं स्वप्न समजून सत्यात उतरवलं. आज तिचं जभरातून कौतुक केलं जातं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा तिचे कौतुक केले आहे.

कारण खरच, तिचा संघर्ष सोपा नाही. सलाम ! व पुढील भावी वाटचाली साठी शुभेच्छा.

आमचं काम एकच ते म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती पोहचायची. जे काम आम्ही सदैव प्रामाणिक, अखंडपणे करत राहणार. जगात घडणाऱ्या, ” अमुक तमुक ” घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून जलद गतीने बातमी, गोष्टी, किस्से पोहचवण्याच्या प्रयत्नात आहोत.

त्यामुळे आपल्याला हा लेख कसा वाटला ? आवडला का ? हो तर हो नाहीतर नाही. अशी आपल्या मनाची प्रांजळ प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्यावारे नक्की कळवा, व माहिती आवडली असेल तर या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका. कारण आम्हाला यांमुळे आणखी लिहायला प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद !…

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -