Sunday, August 14, 2022

थकीत वीजबिल वेळेत वसूल केले नाही; तर राज्य अंधारात जाऊ शकते !.. नितीन राऊत.. उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य..

सध्या महावितरण वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या डोक्यावर ७४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, या विषयावर काल (मंगळवारी) मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये उर्जा विभागावर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत.

बैठकीमध्ये कोण कोणते मुद्दे होते ?

१) डोक्यावर ७४ हजार कोटी कर्ज असताना, उर्जा विभागाने २०० गाड्या खरेदी का केल्या ?

२) उर्जा विभागाला खरंच एवढा तोटा आहे का ?

३) खरेदी केलेला कोळश्याच्या दर्जा बाबत..

४)कृषी पंपाची सबसिडी खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहचते आहे का ?

५)उर्जा खात्याच्या कर्जाचे खापर नेहमी ग्रामीण भागातील लोकांवर का फोडलं जातंय ?

असे अनेक प्रश्न या बैठकी मध्ये उपस्थित केले गेले, ज्याने उर्जा मंत्री नितीन राऊत यांना चांगलाच ‘ शॉक ‘ बसला..

सध्या उर्जा विभागाकडे २ कोटी ८७ लाख इतके ग्राहक असून त्यांची ७३ हजार ८७८ कोटी थकबाकी व वीजनिर्मिती साठी घेतलेले ४५ हजार ४४० कोटी रुपयांचे कर्ज आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने मध्ये ४९ हजार ५७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पथदिव्यांची ६ हजार १९९ कोटी रुपयांची थकबाकी व पाणीपुरवठा विभागाची २ हजार २५८ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचेही बैठकी मध्ये सांगण्यात आले व त्यावर तोडगा काढण्यात आला.

या सर्व प्रकरणावर कृषी मंत्री दादा भुसे यांनी पाणी पुरवठा विभागाकडे २ हजार २५८ कोटी रुपयांची थकबाकी, व विजय वडेट्टीवार यांनी कोळश्याच्या दर्जा प्रकरणी नितीन राऊत यांना खडेबोल सुनावले.

सुनील केदार यांनी अनेक प्रश्नावर बोट ठेवत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना चांगलेच धारेवर धरले. या बैठकीत सगळ्यांच्या डोळ्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत आल्यावर त्यांनी धक्कादायक निर्णय घेतला. तो म्हणजे “थकीत वीजबिल वेळेत वसूल केले नाही तर राज्य अंधारात जाऊ शकते”.. हे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलताना म्हंटले.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -