Friday, September 30, 2022

एक अशी महिला IPS अधिकारी, ज्या देशसेवे सोबत चालवतात विनामूल्य कोचिंग क्लासेस !

नागालँड मधील एका महिला IPS अधिकाऱ्याने खूप प्रेरणादायी असा उपक्रम चालू केला आहे. देश सेवा करता करता ज्ञानदानाचं काम ही अविरतपणे त्यांनी चालू ठेवलेलं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे, डॉ प्रितपाल कौर. त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जो की खूप कौतुकास्पद आहे.

डॉ. कौर यांनी नववी इयत्तेच्या 50 हून अधिक विद्यार्थ्यांसह प्रशिक्षण सुरू केले. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेऊन शिकवण्याचं काम त्या करत आहेत. ज्यात काही नागालँडच्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळालेल्यांपैकी विद्यार्थी आहेत तर काहींनी राज्य सरकारच्या विभागीय परीक्षा पास केलेली आहे. तसेच अनेकजण यंदा यूपीएससी परीक्षा सुद्धा देणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. प्रितपाल कौर या विनामूल्य शिकवणार आहेत.

ही प्रेरणादायक कथा आहे, 2016 च्या बॅचची आयपीएस अधिकारी डॉ. प्रितपाल कौर बत्रा यांची. त्यांची कथा/ काम खूप विशेष आहे; कारण डॉ. कौर या मोठ्या पदावर पोलिस अधिकारी म्हणून आपल्या सर्व व्यस्ततेत असूनही विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कोचिंग क्लासेस चालवत आहेत; तर बरेच लोक सेंद्रिय शेतीच्या युक्त्याही शिकत आहेत. डॉ. कौर यांच्या कडून अनेक विद्यार्थी सध्या शिकवणी घेऊन आयुष्यात आधुनिक होण्याचा प्रयत्न करत आहेत.

डॉ. कौर यांची पहिली पोस्टिंग नागालँडमधील दुर्गम असह्य जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) या पदावर होती. जिथं सहसा कुणीही पदभार स्वीकारायला घाबरतं. तिथं डॉ. कौर धाडसाने काम करत होत्या. तिथल्या लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. स्थानिक लोकांकडून मिळालेला आदर पाहून डॉ. कौर त्यावेळी भारावून गेल्या होत्या. सध्या मात्र त्या “नोक्लेके” जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचसोबत विनामूल्य कोचिंग क्लासेस ही चालवत आहेत.

सुरुवातीला त्यांनी सिव्हिल परीक्षेसाठी कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून शिकवणी देण्याचं काम सुरू केलं. या उपक्रमाला स्थानिक लोकांनी खूप प्रचलित केलं. ज्यामुळे डॉ. कौर यांनाही खूप सहकार्य मिळालं आणि अजून यात भर म्हणून सर्वांच्या शिक्षणाचा पूल भक्कम आणि मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली.

अश्या प्रेरणादायी उपक्रमासाठी डॉ. प्रितपाल कौर यांना टीम अमुक तमुक कडून कडक सलाम… !…

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -