Wednesday, August 17, 2022

10वीच्या विद्यार्थिनीने सोशल मीडियावरच्या मित्राला केले 75 तोळे सोने गिफ्ट.. पहा काय घडले !..

केरळच्या तिरुअनंतपुरम येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे जिथे दहावीच्या विद्यार्थीनीने सोशल मीडियावर भेटलेल्या मित्रांना 75 तोळे सोने भेट दिले.
एशियानेट न्यूजच्या अहवालानुसार, वर्षभरापूर्वी शिबिन नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते की तो आर्थिक अडचणीत आहे. ही पोस्ट पाहून एक 15 वर्षांची शाळकरी मुलीगी त्याच्याशी बोलली आणि त्याच्या अगदी जवळ आली. शिबिनच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तिने एक आश्चर्यकारक पाऊल उचलले.

त्या मुलीच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवण्यात आलेला होता, ज्यामध्ये सोने ठेवले होते. त्या मुलीने तिच्या सोशल मीडियावरच्या मित्राला 75 तोळे सोने दिले.
आईच्या मदतीने शिबिनने हे सोने विकले. नंतर शिबीन आणि त्याच्या आईने घराचे नूतनीकरण केले आणि उर्वरित 9.8 लाख रुपये घरात ठेवले. सोने बेपत्ता झाल्याचे कळल्यानंतर मुलीच्या आईने पोलीसात तक्रार दाखल केली.

त्यानंतर शिबीन आणि तिची आई शाजीला अटक करण्यात आली आणि दोघांनाही रिमांडवर घेण्यात आले.त्या मुलीने पोलिसांना सांगितले की तिने शिबीनला एक वर्षापूर्वी सोने दिले होते. पोलिसांनी शिबीनच्या घरातून सुमारे 10 लाख रुपये जप्त केले आहेत. पण या प्रकरणात एक नवीन वळण आले जेव्हा शिबिनने पोलिसांना सांगितले कि त्याला 75 तोळे सोने मिळाले नाही, त्या मुलीने त्याला फक्त 27 तोळे सोने दिले.

पोलिसही यामुळे गोंधळून गेले आहेत. त्या मुलीने पोलिसांना सांगितले की, 75 तोळे सोन्यापैकी 40 तोळे पलक्कड जिल्ह्यातील दुसऱ्या तरुणाला दिले होते, त्याला ती इन्स्टाग्रामद्वारे भेटली होती. सोने मिळताच पलक्कड जिल्ह्यातील तरुणाने त्या मुलीला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले, पण पोलीस हे स्वीकारण्यास तयार नाहीत.पोलिसांनी सांगितले की, आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल तेव्हाच अधिक माहिती समोर येईल. मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले कि माझे सोने एक वर्षापासून मला मिळत नव्हते मला वाटले ते माझ्याकडून हरवले, पण पोलीस तिच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत..

आमचं काम एकच ते म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती पोहचायची. जे काम आम्ही सदैव प्रामाणिक, अखंडपणे करत राहणार. जगात घडणाऱ्या, ” अमुक तमुक ” घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून जलद गतीने बातमी, गोष्टी, किस्से पोहचवण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे आपल्याला हा लेख कसा वाटला ? आवडला का ? हो तर हो नाहीतर नाही. अशी आपल्या मनाची प्रांजळ प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्यावारे नक्की कळवा, व माहिती आवडली असेल तर या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका. कारण आम्हाला यांमुळे आणखी लिहायला प्रोत्साहन मिळतं.

आणि हो महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे जर काही लेख किंवा माहिती असेल तर ती आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ती लेखाद्वारे तुमच्या नावसाहित वेबसाइट वर पब्लिश करू..धन्यवाद !…

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -