Thursday, September 29, 2022

या हॉस्पिटलमध्ये झाला नवरात्रीचा चमत्कार ! घटस्थापनेच्या दिवशी एकाच वेळी, तब्बल ९ मुलींनी दिला जन्म !….

नवरात्र सुरू झाली आहे. कोरोना काळात देवीचे नऊ अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज प्रत्येक जण देवीकडे एकच मागणी करत असेल की ह्येवं कोरोना कसल्याही परिस्थितीत गेला पाहिजी. अश्यात एक सकारात्मक गोष्ट घडलेली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. योगायोग हा भक्तिमय झाल्यावर किती सोन्याहून पिवळं मग आयुष्य. तर असाच एक योगायोग कल्याण मध्ये घडला आहे. जो वाचून आपल्यालाही साक्षात नऊ अवतारांचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

Image Source : Google

काय झालं की कल्याण येथील पश्चिमेकडील सिंडीकेट परिसरातील वैष्णवी या रूग्णालयात काल तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची घटना घडली आहे. ही घटना खूप आनंदाची, भक्तीची आणि आश्चर्याची आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मीळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र चर्चा सुरू आहे. जणू काही 9 जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.  कारण अश्या घटना खूप क्वचितच घडतात. त्यात नवरात्र म्हणून नऊ देवींनी अवतार घेतला असेल अस त्यांना वाटतय.

Image Source : Google

वैष्णवी या रूग्णालयात शनिवारी म्हणजे काल 11 महिलांची प्रसूती करण्यात आली. यापैकी 9 महिलांनी मुलींना जन्म तर अन्य दोन महिलांनी मुलांना जन्म दिल्याची माहीती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली. आमच्या रूग्णालयात एकाच दिवशी 11 प्रसूती होणे, ही तशी नवीन गोष्ट नाही. मात्र एकाच दिवशी आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 9 मुलींचा जन्म होणे, ही नक्कीच वेगळी आणि आनंदाची बाब असल्याचे कक्कर म्हणाले. या 9 मुलींसह इतर 2 मुलांची आणि त्यांच्या मातांची तब्येत ठणठणीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर अश्या प्रकारे आपल्याला ” नऊ मुलींच्या मार्फत नऊ देवींनी जन्म घेतला. अशी सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -