Friday, August 12, 2022

” हा ” अभिनेता साकारतोय ‘दख्खनचा राजा ज्योतिबाची ‘ भूमिका ! नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला..

कोरोना काळात काळजी घेऊन चित्रीकरण करायला सरकारने परवानगी दिल्याने अनेक चॅनेल ने नवनवीन मालिका निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. त्यात सध्या एक मालिका फार चर्चेत आहे. ती भक्तिमय मालिका असणार आहे. त्या मालिकेचा प्रोमो ही खूप प्रेक्षकांना पसंतीस पडत आहे.

त्या मालिकेचं नाव आहे दखनचा राजा ज्योतिबा. खूप वेगळी मालिका लवरकच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. पण त्यात प्रमुख भूमिका ज्योतिबा ची नेमकं कोण साकारत आहे ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

ज्योतिबाचं माहात्म्य सांगणारी एक नवी मालिका छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका, अर्थात ज्योतिबा कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. मालिकेतला ज्योतिबाचा भूमिका तुमच्यासमोर घेऊन येत आहे, नवोदित अभिनेता विशाल निकम.यापूर्वी तो ‘साता जलमाच्या गाठी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता.

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजन्स, अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारेकरत आहेत. खास बाब म्हणजे ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण चित्रीकरण होणार आहे.

कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला आला असून, लवकरच मालिकेच्या प्रक्षेपणाचा श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेच्या निमित्तानं कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना लॉकडाउननंतर कामाची नवी संधी मिळाली आहे.

मालिकेविषयी महेश कोठारे सांगतात की, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका म्हणजे ज्योतिबाची कथा आहे. ज्योतिबा हे पश्चिम महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे. अंबाबाईच्या हाकेला धावून आलेला हा देव ज्याने रत्नासूर, कोल्हासुर आणि औंधासुराचा वध केला. कोल्हासुराचा वध झाल्यानं त्या परिसराला कोल्हापूर असं नाव पडलं. या कथा आपण पुराणात वाचल्या असल्या, तरी पहिल्यांदाच मालिकेच्या रुपात त्या पाहायला मिळणार आहेत. पौराणिक मालिका साकारणं हे फार आव्हानात्मक असतं. एक तर हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये बजेटची मर्यादा असते.

Find out! Which actor will play the role of Dakhkhancha Raja Jyotiba?

तरीही मालिकेची भव्यता कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. व्हीएफएक्स उत्तम प्रकारे दिसणं महत्त्वाचं असतं. या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरू होत. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हेदेखील आव्हान होतं.चित्रीकरणाला सुद्धा सुरवात झाली आहे.

कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे.

सध्या प्रेक्षकांना या मालिकेत खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. ज्योतिबाच्या कथा अनुभवायला मिळणार आहेत. तर ज्योतिबा च्या मालिकेची आम्ही दिलेली सविस्तर माहिती आपल्याला कशी वाटली ती नक्की कळवा.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news
- Advertisement -